
सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १०-१५ दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपयांचा सरासरी दर होता. उच्चांकी दर सात हजारांपर्यंत मिळत होता. पण, आता आवक तेवढीच असताना देखील कांद्याचे सरासरी दर तब्बल दोन हजार रुपयांनी घसरल्याची स्थिती पहायला मिळत आहे. बुधवारी कांद्याला १८०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.