Solapur: कांद्यावर लावलेल्या निर्यात शुल्कामुळे गेल्या दीड वर्षांपासून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांत असंतोष होता. केंद्राने १ एप्रिलपासून निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनतरच दर सुधारण्याची अपेक्षा आहे..त्यामुळे सोमवारी (ता. २४) सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक ५० टक्क्यांनी घटली असून शेतकरी १ एप्रिलनंतर कांदा बाजारात आणण्याच्या विचारात आहेत. त्यानंतर आवक वाढण्याची शक्यता आहे.सध्या सोलापूर बाजार समितीत काहीअंशी लेट खरीपासह नव्या रब्बी कांद्याची आवक सुरू झाली आहे. मात्र, कांदा निर्यातीवर २० टक्के शुल्क असल्याने निर्यात कमी होती. त्यामुळे कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर कमी मिळत होता. .Google Summer Internship 2025: गूगल इंटर्नशिप प्रोग्राम! या उन्हाळ्यात करा अर्ज आणि तुमच्या करियरची नवी दिशा ठरवा!.परिणामी शेतकऱ्यांमध्ये असंतोष पहायला मिळाला होता. त्याचा सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत फटकाही बसला होता. आधी निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरुन २० टक्क्यांवर व आता उशिरा का होईना निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे. त्यानंतर कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.१५० गाड्या आवक, २ हजारांपर्यंत दरसोलापूर बाजार समितीत दररोज सुमारे ३०० गाड्यांची आवक होते. निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर दरवाढीच्या अपेक्षेने तूर्त कांदा बाजारात आणणे शेतकऱ्यांनी टाळल्यामुळे ती १५० गाड्यांनी कमी झाली आहे. सोमवारी बाजारात १५० गाड्या कांद्याची आवक होती. तर प्रतिक्विंटल १ हजार ते २ हजार रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीने सांगितले..जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कितपत लाभ ?जिल्ह्यात रब्बी हंगामात २० हजार २५३ हेक्टरवर कांद्याची पेरणी झाली आहे. त्यातून २ लाख २० हजार टन कांदा उत्पादन होईल, असा अंदाज आहे. आता रब्बी कांद्याची आवक सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात उन्हाळी कांदा नाही. रब्बी कांदा संपल्यावर व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा बाजारात येऊ शकतो. तर निर्यात वाढली तरी कांद्याची आवक व मागणी यावरच दर अवलंबून राहणार आहे. उशिरा निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कितपत लाभ होणार, याबाबत शेतकऱ्यांत साशंकता आहे..रब्बी कांदा बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर दरवाढीची अपेक्षा आहे. त्यामुळे आवक निम्म्याने घटली आहे. एक एप्रिलपासून निर्यात शुल्क रद्दची अंमलबजावणी होणार असल्याने त्यानंतर दोन-तीन एप्रिलला आवक वाढण्याची शक्यता आहे.- नामदेव शेजाळे, सचिव, बाजार समिती, सोलापूरसध्याही निर्यात सुरूच आहे. निर्यात शुल्क रद्द केल्याने दरात दोन ते अडीच रुपयांचा फरक पडेल. शेवटी कांद्याची आवक व मागणी यावरच दर अवलंबून राहणार आहे.- अमोल बिराजदार, आडत व्यापारी, बाजार समिती, सोलापूरकांदा निर्यात शुल्कचा निर्णय केंद्र सरकारला उशिरा सूचलेले शहाणपण आहे. तरीही निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात उन्हाळी कांदा नसल्याने याचा व्यापाऱ्यांनाच अधिक लाभ होणार आहे. निर्यात शुल्कामुळे आधीच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सरकारने येत्या काळात पुन्हा निर्यातशुल्क लावण्याचा व कांदा आयातीचे धोरण राबवू नये.- विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष, युवा आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सोलापूर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.