
सोलापूर : एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ८० लाख क्विंटल कांदा विकला आणि त्यातून ११३९ कोटींची उलाढाल झाली होती. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला लावलेला कांदा मुसळधार पावसामुळे खराब झाला आणि आवक कमी झाली. एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत बाजार समितीत ५८ लाख ६२ हजार क्विंटल कांदा विकला गेला असून त्यातून शेतकऱ्यांना १३१५ कोटी रुपये मिळाले आहेत.