
सोलापूर : छत्रपती संभाजी नगरहून कांदा घेऊन आलेला ट्रक जुना पुना नाक्याजवळील पुलावरच उलटला. समोरील चाकाचा ॲक्सल जॅम झाल्याने ट्रक उलटल्याचे फौजदार चावडी पोलिसांनी सांगितले. रविवारी (ता. १८) पहाटे साडेपाचच्या सुमारास पलटी झालेला ट्रक बाजूला काढायला तब्बल सहा तास लागले.