सोलापूर जिल्ह्यात केवळ १० टक्के गर्भवती महिलांनी घेतला लसीचा पहिला डोस

जिल्हयात लसीकरणास सुरुवात झाल्यापासून ते आजतागायत केवळ दहा टक्के गर्भवती महिलांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे
सोलापूर जिल्ह्यात केवळ १० टक्के गर्भवती महिलांनी घेतला लसीचा पहिला डोस
सोलापूर जिल्ह्यात केवळ १० टक्के गर्भवती महिलांनी घेतला लसीचा पहिला डोसsakal media
Updated on: 

सोलापूर : कोरोनापासून सर्वांची सुरक्षा व्हावी यासाठी गर्भवती महिलांनीही प्रतिबंधक लस घेऊन स्वतःला सुरक्षित करून घेणे आवश्‍यक असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र अशा महिलांचे लस घेण्याचे प्रमाण केवळ दहा टक्केच असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

सोलापूर जिल्ह्यात केवळ १० टक्के गर्भवती महिलांनी घेतला लसीचा पहिला डोस
सुप्रिया सुळे यांच्याकडून 'राईट टू डिस्कनेक्ट'सह तीन विधेयके सादर

जिल्हयात लसीकरणास सुरुवात झाल्यापासून ते आजतागायत केवळ दहा टक्के गर्भवती महिलांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात ही संख्या अत्यंत कमी आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू आहे. मात्र ओमीक्रॉन या नव्या विषाणूचा प्रसार काही देशांमध्ये सुरू झाला आहे. त्यात जिल्ह्यात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यात गर्भवती महिलांच्या एकूण आकडेवारी पाहता त्यातील दहा टक्के महिलांनी लस टोचून घेतली आहे. जोपर्यंत 100 टक्के लसीकरण होणार नाही, तोपर्यंत कोरोनापासून पुर्णतः सुरक्षितता मिळणार नाही असे तज्ञांनी बोलताना सांगितले. त्यातच कोरोनाची रुग्ण संख्या वाढू नये यासाठी प्रशासनांकडून वेळोवेळी उपाय-योजना केल्या जात आहेत. याच पार्श्‍वभूमीवर गर्भवती महिलांचे लसीकरण हे प्रशासनासमोरील मोठे आवाहन असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात केवळ १० टक्के गर्भवती महिलांनी घेतला लसीचा पहिला डोस
सुप्रिया सुळे यांच्याकडून 'राईट टू डिस्कनेक्ट'सह तीन विधेयके सादर

ठळक बाबी.....

  • ही आहेत लस न घेण्याची कारणे

  • जनजागृती हवी तेवढी अद्यापही झालेली नाही.

  • गर्भवती महिलांचे समूहाने समुपदेशन होणे आवश्‍यक - केंद्रावरील वाढती गर्दी पाहून अनेकांचा लस घेण्यास नकार

  • लस घेतल्यानंतर बाळावर परिणाम तर होणार नाही ही मनात भीती

  • अशा विविध कारणांमुळे गर्भवती महिलांची लसीकरणाकडे पाठ फिरवत असून, ही संख्या अगदीच कमी दिसून येत आहे.

  • सोलापूर शहर जिल्ह्यात महापालिकेच्या आणि इतर ठिकाणी असणा-या लसीकरण केंद्रावर गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून, रांगेत उभे न राहता त्यांना व दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जाते. मात्र नियमित अशा अत्यंत कमी महिला लसीकरणासाठी समोर येत आहेत.

पहिला डोस घेतलेल्या गर्भवती महिलांनी - 3 हजार 42

दुसरा डोस - 263

जिल्ह्यात एकूण गर्भवती महिला - 40 हजार

"लसीकरण सुरु झाल्यापासून जिल्हयातील दहा टक्‍के गर्भवती महिलांनी लस घेतली आहे. आगामी काळात गर्भवती महिलांचे लसीकरण वाढविण्यावर आमचा भर असणार आहे. त्यामुळे महिलांनी न घाबरता लस घ्यावी."

- अनिरुद्ध पिंपळे, समन्वयक, जिल्हा लसीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
netaji khandagale and kiran jamdade
Central Team Inspects Drought-Hit Villages and Crop Damage in Mangalwedha, Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com