'एसपी' तेजस्वी सातपुतेंचे ऑपरेशन परिवर्तन! हातभट्टी दारुचे गाव बनले उद्योगगाव

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 'ऑपरेशन परिवर्तन' सुरु केले. कारवाई करतानाच दुसरीकडे प्रबोधनावरही त्यांनी भर दिला. गुन्हेगारीचा अंत शेवटी वाईटच असतो, हे उदाहरणासह त्या कुटुंबातील तरुणांना व महिलांना पटवून दिले. त्यातून त्यांचे मत परिवर्तन झाले आणि त्यांनी हा व्यवसाय सोडण्याचा निर्धार केला. आता हातभट्टी दारु तयार करणारे हात समाजमान्य व्यवसायाकडे वळल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हातभट्टी दारू निर्मिती अशी ओळख असलेला मुळेगाव तांडा आता उद्योगगाव म्हणून नावारुपाला येऊ लागला आहे.
opration parivartan
opration parivartanesakal

सोलापूर : पोलिसांना चकवा देऊन अवैधरित्या हातभट्टी दारु तयार करण्याचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबियांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी, त्यांची पुढची पिढी गुन्हेगारी जगतापासून दूर राहावी, त्यांच्या कुटुंबातील महिलांना शांत झोप लागावी, पती किंवा तरुण मुलाची चिंता लागू नये हाही त्यामागील हेतू होता. त्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 'ऑपरेशन परिवर्तन' सुरु केले. कारवाई करतानाच दुसरीकडे प्रबोधनावरही त्यांनी भर दिला. गुन्हेगारीचा अंत शेवटी वाईटच असतो, हे उदाहरणासह त्या कुटुंबातील तरुणांना व महिलांना पटवून दिले. त्यातून त्यांचे मत परिवर्तन झाले आणि त्यांनी हा व्यवसाय सोडण्याचा निर्धार केला. आता हातभट्टी दारु तयार करणारे हात समाजमान्य व्यवसायाकडे वळल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हातभट्टी दारू निर्मिती अशी ओळख असलेला मुळेगाव तांडा आता उद्योगगाव म्हणून नावारुपाला येऊ लागला आहे.

opration parivartan
सोलापूर विद्यापीठात भूकंपाची यंत्रणा! पुणे, नगर, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूरची मिटली चिंता

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मुळेगाव तांडा येथील परिवर्तन उद्योग समुहाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी ते म्हणाले, लोकांनी अवैध हातभट्टी दारु तयार करण्याचा व्यवसाय खरोखरच सोडला यावर विश्‍वास बसत नव्हता. पण, शिलाई मशीन व फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चा रोजगार थाटण्यासाठी याठिकाणी आलेल्या महिलांकडे पाहून खरोखरच 'ऑपरेशन परिवर्तन' यशस्वी झाल्याचा आनंद झाला. 'ऑपरेशन परिवर्तन'अंतर्गत मुळेगाव तांड्यातील 41 महिलांना पहिल्या टप्प्यात जिल्हा उद्योग केंद्र व मिटकॉनतर्फे 45 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या महिलांना मुख्यमंत्री रोजगार योजनेतून 18 शिलाई मशीन घेऊन देण्यात आले. सर्वांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर सर्वजण या उद्योगात यशस्वी भरारी घेतील, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला. यावेळी 'सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा, सहायक जिल्हाधिकारी मनिषा आवळे, प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, दक्षिणचे तहसिलदार अमोल कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी ऑपरेशन परिवर्तनाच्या माध्यमातून हातभट्टी दारु तयार करणाऱ्यांचे मन परिवर्तन करणाऱ्या पोलिस अधिकारी, अंमलदारांचाही सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतूक केले.

opration parivartan
मार्चमध्येच घशाला कोरड! माजी महापौर, सभागृह नेत्यांच्या प्रभागातच पाच दिवसाआड पाणी

मुळेगाव तांडा झाले उद्योगगाव
अवैधरित्या हातभट्टी दारु निर्मितीचे मुख्य केंद्र म्हणून मुळेगाव तांड्याची राज्यभर ओळख झाली होती. तेथील अनेक कुटुंबातील महिला, तरुणही त्या व्यवसायात गुंतले होते. त्यांना त्या व्यवसायापासून परावृत्त करून पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 'ऑपरेशन परिवर्तन' हाती घेतले. पण, केवळ त्यांच्यावर कारवाई करणे हा शेवटचा पर्याय नसून त्यांचे प्रबोधनही महत्वाचे असून त्यासाठी महिला व तरुणांची साथ लागणार होती. त्यानुसार त्यांनी प्रबोधनाचे धडे दिले आणि आता हातभट्टी दारु गाळण्यासाठी मदत करणाऱ्या महिला स्वत:चा रोजगार सुरु करण्यास सज्ज झाल्या आहेत. त्या महिलांनी मुळेगाव तांड्याचे नामकरण उद्योगगाव असे केले असून त्याठिकाणी 'परिवर्तन उद्योग समुह' सुरु झाला आहे.

opration parivartan
ऊसतोड कामगारच दरोडेखोर! गाडी भाड्यासह झालेला खर्च काढण्यासाठी शिजविला दुसरा प्लॅन
  • ऑपरेशन परिवर्तनची वाटचाल...
    - मुळेगाव तांड्याचा अभ्यास करताना दारु कुठे तयार केली जाते, कोणत्या गावात विक्री होते, याची यादी बनविली
    - 'ऑपरेशन परिवर्तन' राबविताना 537 केसेस दाखल झाल्यास असून साडेसोळा हजार हातभट्टी दारु केली जप्त
    - पोलिसांनी आठवड्यातून दोन दिवस कारवाई करताना मुळेगाव तांडा परिसरातून जवळपास 95 लाखांचा मुद्देमाल जप्त केला
    - जनजागृतीतून तरुण व महिलांना गुन्हेगारी वाईट असल्याची करून दिली जाणीव
    - हातभट्टी दारु बनविणे बंद केलेल्यांना नवा समाजमान्य व्यवसाय, त्या कुटुंबातील तरुणांना नोकरी देण्याचा यशस्वी प्रयत्न
    - जिल्हा उद्योग केंद्र व मिटकॉनतर्फे मुळेगाव तांड्यातील 41 महिलांना उद्योगाचे प्रशिक्षण
    - मशीन ऑपरेटर व फॅशन डिझायनिंगच्या 45 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर सुरु झाला परिवर्तन उद्योग समुह
    - मुख्यमंत्री रोजगार योजनेतून कर्ज उपलब्ध करून देऊन 18 शिलाई मशीन खरेदी केल्या
    - हातभट्टी दारु निर्मितीची ओळख पुसून मुळेगाव तांड्यावर 'परिवर्तन' उद्योग समुहाची सुरवात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com