Solapur: युद्धाचे पडघम वाजू लागले की पतीचे हौतात्म्य आठवते. या पेटलेल्या वर्षातील युद्धाला पतीच्या, मुलाच्या हौतात्म्याची धग आहे. भारताने दहशतवादी तळांवर केलेला एअरस्ट्राईक योग्यच आहे. दहशतवाद्यांनी निष्पापांचा बळी घेतला होता..त्याचा भारताने बदल घेतला आहे. भारतीय सैनिकांनी केलेली कामगिरी खरोखरच अभिमानास्पद आहे. कारवाईमुळे भारताच्या लेकींना न्याय मिळाला, अशी भावना वीरमाता, वीरपत्नी यांनी व्यक्त केली, पहलगाम येथील अतिरेकी हल्ला व त्यानंतर भारताने दिलेल्या लष्करी प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहीद सैनिकांचे स्मरण केले गेले, शहिदांच्या वीरपत्नीनी त्यांच्या पतीच्या काश्मीरमधील शौर्याच्या आठवणींना मनोगतातून उजाळा दिला..Mohini Ekadashi Vrat 2025: मोहिनी एकादशी व्रत कसे करावे? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी.पाच सहा दिवस लग्न झालेल्या मुलीच्या पतीला मारणारे अतिरेकी निर्दयी आहेत. त्यांचा बदला घेतला याचे समाधान आहे. पती शहीद दत्तात्रय माने हे १९८७ला कोलकत्ता येथील सिग्नल रेजिमेंटमध्ये प्रवेश केला. लडाखमध्ये सीमेचे संरक्षण करताना ते बर्फात खोलवर रुतल्याची घटना घडली. त्यानंतर १५ सप्टेंबर २००१ ला शहीद झाले. माझ्या दुःखाएवढेच अतिरेक्यांनी मारलेल्या मुलीच्या पतीचे दुःख मोठे आहे.-सुषमा माने (शहीद दत्तात्रय माने यांच्या पत्नी).पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये अनेक निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. याचा बदला म्हणून भारताने नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करून जशास तसे उत्तर दिले आहे. भारतीय लष्कराचा अभिमान आहे. पती मेजर कुणाल गोसावी यांना २९ नोव्हेंबर २०१६ रोजी जम्मू येथील नगरोटा येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले. पाकिस्तानी दहशदवाद्यांना कायमचा धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे.- उमा कुणाल गोसावी, (शहीद कुणाल गोसावी यांच्या पत्नी) अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवून महिलांचे कंकू सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल सैन्य दलाचे आभार. कारगिलमध्ये अतिरेकी घुसल्याने त्यांच्यावर कारवाई करताना सैन्य दलाला अडचणीला सामोरे जावे लागले, ती लढाई जिंकली मात्र ते यश पाहण्यासाठी पती शहीद किसन माने हयात नव्हते. पती २० ऑक्टोबर १९९९ ला शहीद झाले. ते नसण्याचे दुःख पाठीशी घेत दोन मुलांना उच्चशिक्षित केल्याचा अभिमान आहे.- श्यामल माने (शहीद किसन माने यांची पत्नी).Kedarnath Temple Travel: केदारनाथमध्ये घोड्यांना ‘नो एन्ट्री’; हा निर्णय का घेतला गेला? वाचा सविस्तर माहिती.ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी स्थळांवर हल्ला केला आहे तो योग्य आहे. दहशतवादाची पाळेमुळे संपवायला हवीत. आम्ही २६/११ चा हल्ला अजून विसरलो नाही. मुलगा २६/११च्या मुंबई हल्ल्यात शहीद झाला. दहशतवाद संपवायचा असेल तर असाच खात्मा करावा लागेल. तरच भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहण्याच धाडस करणार नाही, सैन्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे.- साखराबाई सुभाष शिंदे (शहीद राहुल शिंद यांच्या आई).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.