सौरऊर्जेवर चालणार आता स्प्रिंकलर! 'ऑर्किड'च्या विद्यार्थ्यांचा आविष्कार

सौरऊर्जेवर चालणार आता स्प्रिंकलर ! "ऑर्किड'च्या विद्यार्थ्यांचा आविष्कार
सौरऊर्जेवर चालणार आता स्प्रिंकलर ! "ऑर्किड'च्या विद्यार्थ्यांचा आविष्कार
सौरऊर्जेवर चालणार आता स्प्रिंकलर ! "ऑर्किड'च्या विद्यार्थ्यांचा आविष्कारCanva
Summary

"सोलर ऑपरेटेड वॉटर स्प्रिंकलर'द्वारे दुर्गम ठिकाणी शेतकऱ्यांची विजेची समस्या सोडविण्याचा प्रयत्न ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला आहे.

सोलापूर : "सोलर ऑपरेटेड वॉटर स्प्रिंकलर'द्वारे (Solar operated water sprinkler) दुर्गम ठिकाणी शेतकऱ्यांची विजेची समस्या सोडविण्याचा प्रयत्न ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Orchid College of Engineering) विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रणालीत ओलावा सेन्सरचा वापर करून स्वयंचलित जलप्रवाह नियंत्रणासह सौरऊर्जेवर (Solar energy) चालणारा वॉटर पंप वापरला आहे. ही प्रणाली ग्रीड ऊर्जेचा (Grid energy) वापर कमी करून विजेची बचत करते आणि पाण्याचा वापर कमी करून पाण्याचीही बचत करते.

सौरऊर्जेवर चालणार आता स्प्रिंकलर ! "ऑर्किड'च्या विद्यार्थ्यांचा आविष्कार
बालमनातील माणुसकी! बेघर-भुकेल्या आजोबांना भरवताहेत घास

देशात सहा लाखांपेक्षा अधिक खेडी असून, त्या ठिकाणचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती आहे. देशात सर्वसाधारणत: 21 दशलक्ष सिंचनपंप आहेत. त्यापैकी नऊ दशलक्ष हे डिझेलवर तर उर्वरित पॉवर ग्रीडवर आहेत. अनेक गावे विजेपासून दूर असल्याने ग्रीड सिस्टीम विकसित करण्यासाठी मोठा खर्च होतो. त्यासाठी सौरऊर्जेचा वापर करून स्प्रिंकलरद्वारे जलसंधारणाचा विकास करणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. देशात लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तर दुसरीकडे काही ठिकाणी शेतीसाठी आवश्‍यकतेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे मातीची सुपिकता कमी होऊन क्षारता वाढते आणि जमिनीची पीक उत्पादनाची क्षमताही घटते. याचा विचार करून ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेतील ओंकार जळकोटकर, राकेश परदेशी, सौरभ कटारे, संकेत राठोड व रोहित गायकवाड यांनी प्रा. एस. एस. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तयार केला.

सौरऊर्जेवर चालणार आता स्प्रिंकलर ! "ऑर्किड'च्या विद्यार्थ्यांचा आविष्कार
AAI मध्ये सिनिअर असिस्टंट पदांची भरती! 31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

प्रकल्पाची वैशिष्ट्ये...

  • सौरऊर्जेवरील स्वयंचलित सिंचन प्रणाली मातीच्या ओलाव्याद्वारे पाण्याचे अचूक प्रमाण निश्‍चित करते

  • इंटरनेट ऑफ थिंक्‍स्‌ (आयओटी) तंत्रज्ञान विकसित केल्याने सौरऊर्जा संसाधने ऑपरेट, देखरेख आणि त्रयस्थपणे नियंत्रित करता येतात

  • या प्रकल्पासाठी दहा गुंठे क्षेत्र लॉनसाठी वापरले जाते; संपूर्ण क्षेत्र स्प्रिंकलरद्वारे व्यापते

  • सिस्टीममध्ये 24 मिनी स्प्रिंकलर वापरले असून दोन एचपी पंपाद्वारे चालते स्प्रिंकलर

  • जमिनीतील आर्द्रता शोधण्याचे कार्य ओलावा सेन्सरद्वारे होते. ग्रामीण दुर्गम भागात वीज व पाणी बचतीवर हा प्रकल्प रामबाण उपाय

'अ‍ॅग्री शॉप'द्वारे शेतीमालाचा मिळेल चांगला दर

शेतकरी व ग्राहकांमधील दलालांची गर्दी कमी करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळावा म्हणून एन. के. ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सायली झाकणे, शिवांजली देशमुख, शीतल आबाचणे व आरती सोनटक्के यांनी प्रा. एम. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "अ‍ॅग्री शॉप' हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन बनविले आहे. त्यामुळे फळे, भाजीपाल्याची तपशीलवार माहिती ग्राहकांना देऊन ऑनलाइनच्या माध्यमातून ग्राहक शेतमाल खरेदी करू शकणार आहे. शेतमालाच्या दराची सविस्तर माहिती ग्राहकांना मिळणार असल्याने त्यांची फसवणूक बंद होईल, असा विश्‍वास त्या विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com