शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश। प्राथमिक शाळा आता ७.१० ते ११ पर्यंतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

3School_20fb.jpg
शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश। प्राथमिक शाळा आता ७.१० ते ११ पर्यंतच

शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश। प्राथमिक शाळा आता ७.१० ते ११ पर्यंतच

सोलापूर : शहर-ग्रामीणमधील प्राथमिक शाळांची वेळ आता शिक्षणाधिकाऱ्यांनी बदलली आहे. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी हा निर्णय घेतला आहे. ‘भविष्यातील उष्माघाताच्या बळीला जबाबदार कोण’ या मथळ्याखाली १० एप्रिलला सकाळने भूमिका मांडली होती. त्याची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: सदावर्तेंच्या अडचणीत वाढ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सध्याची उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे काही शिक्षक संघटनांनी मागणी केल्याप्रमाणे शाळेच्या वेळेत अंशत: बदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. उद्यापासून (मंगळवार) जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा सकाळी ७.१० ते ११ वाजेपर्यंत सुरु राहतील, असे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तत्पूर्वी, सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखखा वाढल्याने उष्माघाताचे रुग्ण वाढले होते. त्याचवेळी दुपारी साडेबारापर्यंत शाळा असल्याने चिमुकल्यांना शाळा सुटल्यानंतर ऐन उन्हाचा तडाख्यातच घरी जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने चिमुकल्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेची दखल घेत स्पष्टपणे भूमिका मांडली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यानुसार शाळेची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पालकांसह अनेक शिक्षकांनी ‘सकाळ’चे आभार मानले.

हेही वाचा: अडीच वर्षांत रोखले १२०० बालविवाह! शाळांमधील मुलींचा घटतोय टक्का

तीनवेळा बदलली वेळ
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर फेब्रुवारीत शाळा सुरु झाल्या आणि १०० विद्यार्थ्यांची उपस्थिती असावी, असे शालेय शिक्षण विभागाने आदेश काढले. पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग एप्रिलअखेर पूर्णवेळ सुरू राहतील, असे त्या आदेशात नमूद होते. पण, शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर ही वेळ सकाळी साडेसात ते साडेबारापर्यंत करण्यात आली. आता पुन्हा त्यात बदल करण्यात आला आहे. कडक उन्हाळ्याची जाणीव असतानाही असे तिनवेळा आदेश निघाल्याने मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व मुलांना मनस्ताप सहन करावा लागला.

Web Title: Order Of The Education Officer Primary School Now Only From 710 To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..