esakal | कोरोना काळात डॉक्‍टराने घेतले सेंद्रीय आंब्याचे उत्पादन 

बोलून बातमी शोधा

dr shital fade.jpg

डॉ. फडे यांचा पंढरपूरमध्ये दवाखाना आहे. तेथे त्यांची प्रॅक्‍टीस चांगली चालत होती. गेल्यावर्षापासून कोरोनामुळे पंढरपुरात लॉकडाउन पडले. तेव्हा लोक घरातच बसून राहिले. त्यातच लोकांच्या नेहमीच्या आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे किरकोळ आजारी पडणाऱ्या पेशंटचे दवाखान्यात येण्याचे प्रमाण फारच कमी झाले. त्यामुळे डॉ. फडे यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेत पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला.

कोरोना काळात डॉक्‍टराने घेतले सेंद्रीय आंब्याचे उत्पादन 
sakal_logo
By
मोहन काळे

रोपळे बुद्रुक (सोलापूर)  शिरढोण (ता. पंढरपूर) येथील डॉ. शितल मोहनलाल फडे यांनी लॉकडाउन व त्यानंतरही कोरोनाच्या काळात आपली शेती फुलवून दर्जेदार सेंद्रीय केशर आंब्याचे उत्पादन घेतले आहे. आंब्याच्या काढणीला अजून वेळ असला तरी यंदा दोन एकरातून किमान 15 टन आंब्याचे उत्पादन मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी नवनिर्मितीचा आनंदच घेतला. 
डॉ. फडे यांचा पंढरपूरमध्ये दवाखाना आहे. तेथे त्यांची प्रॅक्‍टीस चांगली चालत होती. गेल्यावर्षापासून कोरोनामुळे पंढरपुरात लॉकडाउन पडले. तेव्हा लोक घरातच बसून राहिले. त्यातच लोकांच्या नेहमीच्या आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे किरकोळ आजारी पडणाऱ्या पेशंटचे दवाखान्यात येण्याचे प्रमाण फारच कमी झाले. त्यामुळे डॉ. फडे यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेत पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी भारत रानरूई यांचे मार्गदर्शन मिळाले. आठ वर्षे वयाच्या केशर जातीच्या आंब्याच्या बागेतून त्यांना आजवर कधी घरी मनसोक्त खाण्यापुरतेही आंबे मिळाले नाहीत. यंदा मात्र लॉकडाउनच्या काळात शेतीला पुरेसा वेळ देता आल्यामुळे त्यांच्या बागेतील आंब्यांची झाडे फळांनी लगडून गेली आहेत. 
डॉ. फडे यांनी दोन एकर आंब्याच्या बागेतून दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी नैसर्गिक व जैविक औषधे वापरण्यावर भर दिला. दूध व गुळाचा वापर वाढवला. कॅल्शियमसारख्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळकूज होऊ नये, म्हणून देशी गोमूत्र व गोमयाचा खूबीने वापर केला. फळमाशी लागू नये म्हणून ट्रॅप बसवण्यात आले. चिकट सापळ्यांचा वापर केला, तर कीटकनाशक म्हणून काही मसाल्यांचा वापर केला. बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा, सुडोमोनस व बॅसिलस सप्टेलीसचा या जैविक घटकांचा वापर केला. त्यामुळे डॉ. फडे यांच्या बागेत दर्जेदार आंब्याचे उत्पादन आले आहे. सरासरी एका फळाचे वजन 200 ग्रॅमच्या पुढे असणाऱ्या फळांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या बागेत आता आंबा एक्‍सोर्ट करणाऱ्या व्यापाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. 

पहिल्यांदाच साधारण 15 टन आंब्याचे उत्पादन मिळेल. 

लॉकडाउनच्या काळात मला शेतीसाठी भरपूर वेळ देता आला. त्यामुळे यंदा मला विषमुक्त आणि पोषण मुलद्रव्यांनी युक्त अशा दर्जेदार सेंद्रीय आंब्याचे उत्पादन घेऊ शकल्याचे समाधान मिळाले. खर तर इतक्‍या वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच साधारण 15 टन आंब्याचे उत्पादन मिळेल. 
- डॉ. शितल फडे, पंढरपूर