
सोलापूर : राज्यातील लातूर, सांगली, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर (पंढरपूर) या जिल्ह्यातील बालगृहातील १४ मुली त्यांच्या पुढील शिक्षणासाठी, नोकरीसाठी व वसतिगृहातील प्रवेशासाठी अनाथ प्रमाणपत्र मागत आहेत. पण, त्यांना एक-दीड वर्षांपासून ते मिळालेले नाही. यावर ‘सकाळ’ने सोमवारी ‘त्या’ १४ मुलींना मिळेना अनाथाचे प्रमाणपत्र’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यावरून भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषदेत आवाज उठविला. सभापती राम शिंदे यांनी शासनाने त्यासंदर्भातील सविस्तर माहिती द्यावी व कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत.