
सोलापूर : जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या सहकार्याने ‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेने जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना २१ प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा करून झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील साडेतेरा हजार दिव्यांग मुख्य प्रवाहात येणार आहेत.