
सोलापूर : माढेश्वरी बॅंकेचे संचालक व माढ्यातील अंजनगावचे (उ) माजी सरपंच गणेश गोरख काशीद (वय ६७) यांच्या दुचाकीच्या (एमएच ४५/एएम ९१४३) डिक्कीतील दोन लाख रुपये चोरट्याने पाच ते दहा मिनिटातच लंपास केले आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध माढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.