उळेतील युवकांच्या "आक्‍सिजन'ची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

उळे येथील युवकांच्या ऑक्‍सिजन या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Oxygen
OxygenCanva
Summary

ऑक्‍सिजन बाबतच्या जनजागृतीची गरज या लघुपटातून अधोरेखित केली आहे.

दक्षिण सोलापूर : उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथील युवा कलाकारांनी तयार केलेल्या "ऑक्‍सिजन' (Oxygen) या लघुपटाची (Short film) आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत (International Film Competition) निवड झाली आहे. या कामगिरीने येथील युवकांनी अटकेपार झेंडा रोवला आहे. कोरोना महामारीच्या भयानक परिस्थितीत अनेकांना ऑक्‍सिजन न मिळाल्याने जीव गमवावा लागला. त्यामुळे ऑक्‍सिजन बाबतच्या जनजागृतीची गरज या लघुपटातून अधोरेखित केली आहे. (Oxygen, a film made by the youth of Ule, was selected for the international competition)

Oxygen
चार टप्प्यांत शिथिल होणार लॉकडाउन? दुकानांची वेळ 7 ते 2 पर्यंत

येथील प्रदीप हनुमंत माने यांनी विशाल जगदाळे, ओंकार पाटील, नमन जाधव, अजय घाटे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रसाद डांगे, साहेबा मोरे, अक्षय मुतेलू या युवा कलाकारांच्या सहाय्याने हा लघुपट बनवला असून, त्याची पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रदीप माने यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. विशाल जगदाळे व ओंकार पाटील हे लघुपटाचे निर्माते आहेत. तर कलाकार म्हणून ज्ञानेश्वर शिंदे, प्रसाद डांगे, साहेबा मोरे, अक्षय मुतेलू यांनी भूमिका साकारली आहे. नमन जाधव व अजय घाटे यांनी कॅमेरामनची भूमिका बजावली आहे. या लघुपटात मुख्य भूमिका सादर करणारा ज्ञानेश्वर शिंदे हा कर्णबधिर आहे. तरीही त्याने उत्तम भूमिका केल्याचे सांगत ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचा आभारी असल्याचे दिग्दर्शक प्रदीप माने यांनी सांगितले. चित्रीकरणासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे अभियंता राजेश जगताप यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचेही प्रदीप माने यांनी सांगितले.

Oxygen
सर्वांत तरुण सरपंचाची कमाल ! पंचसूत्रीद्वारे गाव कोरोनामुक्त

मित्राच्या आईचा कोरोनाने फक्त ऑक्‍सिजन न मिळाल्याने जीव गेला. हे खूप जिव्हारी लागल्याने ऑक्‍सिजनविषयी समाज प्रबोधन करण्याचा विचार मनात घेऊन कथा लिहिण्यास सुरवात केली आणि त्याचे चित्रीकरणही पूर्ण केले. गेल्या चार वर्षांपासून बरेच सामजिक संदेश मी लघुपटांमार्फत सादर केले आहेत. त्यामध्ये स्मॉल मिस्टेक, सच्चा देशभक्त, तायडे, हेल्मेट या लघुपटांचा समावेश आहे. पुणे, औरंगाबाद, ठाणे व दिल्ली येथील स्पर्धेत त्यांची निवड झाली होती. त्या अनुभवाच्या जोरावरच ऑक्‍सिजन हा लघुपट बनवला. त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे.

- प्रदीप माने, लेखक व दिग्दर्शक

बातमीदार : श्‍याम जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com