जिल्ह्यात वाढली ऑक्‍सिजनची मागणी ! टेंभुर्णी, मोहोळ येथील कारखान्यांतून होतेय पुरेशा प्रमाणात ऑक्‍सिजनची निर्मिती

Oxygen
Oxygen
Updated on

सोलापूर : जिल्ह्यात ऑक्‍जिसन निर्मितीचे तीन उद्योग असून त्यातून सध्या 43 मे. टन ऑक्‍सिजनची निर्मिती केली जात आहे. सद्य:स्थितीत विविध रुग्णालयांना त्यांच्या मागणीनुसार 13 मे. टन ऑक्‍सिजन पुरवठा केला जात आहे. सध्या 33 मे. टन ऑक्‍सिजन अतिरिक्‍त असून ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज आहे, त्यांच्यासाठी पुरेसा ऑक्‍सिजन आपल्याकडे असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आता उपलब्ध झाली असून, 45 वर्षांवरील सर्वांनी लस टोचून घ्यावी. घराबाहेर पडताना मास्क घालावा, गर्दीत जाणे टाळावे, जेणेकरून आपल्यामुळे आपल्या कुटुंबातील को-मॉर्बिड रुग्ण अथवा लहान मुलाला काही धोका होणार नाही, याची नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. 

बार्शी, माढा, माळशिरस, करमाळा, पंढरपूर या तालुक्‍यांमध्ये रुग्णवाढ मोठी आहे. परंतु, त्या तालुक्‍यांत लॉकडाउन करण्याचा कोणताही विचार नाही. मात्र, नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करायलाच हवे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील मृत्यू वाढू लागले असून, त्यासंदर्भात महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याशी चर्चा करून त्यांना काही सूचना केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. जिल्ह्यात दररोज सरासरी साडेपाच ते सहा हजार संशयितांची टेस्ट केली जात असून शहरातील टेस्टिंगही वाढले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयांच्या मागणीनुसार त्यांना ऑक्‍सिजन पुरवठा करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आल्याचेही श्री. शंभरकर यांनी सांगितले. 

ऑक्‍सिजनचा जिल्ह्यात मुबलक साठा 
शहर-जिल्ह्यात ऑक्‍सिजन बेड, व्हेंटिलेटरची कमतरता पडणार नाही. आपल्याकडे टेंभुर्णीतील एक आणि मोहोळ तालुक्‍यातील दोन कारखान्यांतून ऑक्‍सिजनची निर्मिती केली जात आहे. शहरातील काही मोठी रुग्णालये कर्नाटक, पुण्यावरून ऑक्‍सिजन घेतात. ऑक्‍सिजनविना रुग्णांचे हाल होतील, अशी स्थिती सोलापूर जिल्ह्यात नाही. परंतु, नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वत:चे कुटुंब सुरक्षित ठेवावे. 
- मिलिंद शंभरकर, 
जिल्हाधिकारी, सोलापूर 

जिल्ह्यातील ऑक्‍सिजनची स्थिती 

  • ऑक्‍सिजनचे कारखाने : 3 
  • उत्पादित होणारा ऑक्‍सिजन : 46 मे. टन 
  • दररोजची ऑक्‍सिजन मागणी : 13 मे. टन 
  • अतिरिक्‍त असलेला ऑक्‍सिजन : 33 मे. टन 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur civil hospital
solapur bar asociation election
Cattle Rescue
Solapur ZP
Marathi News Esakal
www.esakal.com