Praniti Shinde: भारतीय सैन्यदलापुढे पाकला गुडघे टेकावे लागले: खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेसच्या जय हिंद यात्रेला प्रतिसाद
शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा पुतळा परिसरात जय हिंद यात्रा काढण्यात आली.
MP Praniti Shinde addresses the crowd during Jai Hind Yatra, praises Indian Army’s valor.Sakal
सोलापूर : अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन, शहीदांना श्रद्धांजली, काँग्रेस देशासोबत आणि सैन्यदलासोबत आहे. भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले, असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.