Solapur Accident: पालखी महामार्गावरील अपघातात एक महिला ठार; सहाजण जखमी, व्हॅनचा टायर फुटल अन् अकंटेनरला धडक
हडपसर (पुणे) येथील रहिवासी पाहुण्यांच्या लग्न समारंभासाठी अकलूजला आले होते. लग्न समारंभ झाल्यानंतर ते अकलूजहून नातेपुते मार्गाने हडपसरला निघाले होते. त्याचवेळी व्हॅनचा (एमएच १२- पीएन ५३५१) टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
Scene from Palkhi Highway accident where a van collided with a container after a tire burst, killing one womansakal
नातेपुते : नातेपुते शहराच्या पश्चिमेस श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील समाधान ढाब्याजवळ व्हॅनचा टायर फुटल्याने व्हॅन रस्त्यावर उभ्या असलेला कंटेनरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली असून, सहाजण जखमी झाले आहेत.