
पंढरपूर : सांगोला उपसा सिंचन योजनेला पंढरपूर तालुक्यातील शेतकर्यांनी विरोध केला आहे. योजनेसाठी बाधित होणार्या जमिनीला पाच मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. "आधी दाम नंतर काम" अशी भूमिका घेत येथील बाधित शेतकर्यांनी आज पळशी येथे अर्धनग्न आंदोलन केले. भूमिपूजन होण्यापूर्वीच शेतकर्यांनी विरोध केल्याने खळबळ उडाली आहे.