
-संदीप गायकवाड
उ. सोलापूर : यावर्षी सोलापूरमध्ये रमजान ईदच्या शिरखुर्म्यात दूध पंढरीचे दूध असणार नाही. यावर्षी पहिल्यांदाच जिल्हा दूध संघाला ईदसाठी दूध विक्री करण्यात अपयश आले आहे. याचा फायदा इतर खासगी संघांनी घेतला असून, पुणे जिल्ह्यातील एका संघाने तब्बल तीन लाख लिटर सुटे दूध विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.