Pandharpur Mahapuja : नाशिकच्या 'या' शेतकरी दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्री शिंदेंसोबत 'महापूजा' करण्याचा मान; मानाचे ठरले वारकरी

आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल झाले आहेत.
Pandharpur Ashadhi Ekadashi Mahapuja
Pandharpur Ashadhi Ekadashi Mahapujaesakal
Updated on
Summary

हे दाम्पत्य नाशिक जिल्ह्यातील अंबासन (ता. सटाणा) या गावचे रहिवासी असून गेली 16 वर्षे ते वारी करत आहेत.

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल झाले आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत महापूजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे या भाविकाला‌ मिळाला आहे.

बाळू शंकर अहिरे (वय ५५), आशाबाई बाळू अहिरे (वय ५०) हे दाम्पत्य यंदा मानाचे वारकरी ठरले असून मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा (Pandharpur Mahapuja) करण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

Pandharpur Ashadhi Ekadashi Mahapuja
होलार समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा; प्रबोधनकार ठाकरे चौकात उडाला एकच गोंधळ, काय आहे कारण?

हे दाम्पत्य नाशिक जिल्ह्यातील अंबासन (ता. सटाणा) या गावचे रहिवासी असून गेली 16 वर्षे ते वारी करत आहेत. या दाम्पत्याचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीत भक्तीचा महापूर आला आहे. आज जवळपास 15 लाखाहून अधिक भाविक वारीसाठी दाखल झाले आहेत. पंढरी नगरी विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे. चंद्रभागेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Amruta Fadnavis Fugdi Video
CM Devendra Fadnavis Performs Official Vitthal Mahapuja
Honourary Warkari Balasaheb Mane story
Devendra Fadnavis Vitthal Mahapuja in Pandharpur
Marathi News Esakal
www.esakal.com