Crime
sakal
मोहोळ - वारकऱ्यांची आषाढी वारी सुखकर व्हावी, त्यांना चोरांचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शना खाली प्रथमच पोलीसांचे 'माऊली स्कॉड' स्थापन केले असून, पंढरपुरातील वारीत दिंडी व पालखीत संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या 21 महिला व 10 पुरुष यांना मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्या समोर चांगल्या वर्तणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन व समज देऊन त्यांना सोमवार ता 20 रोजी सोडून देण्यात आले.