
-राजकुमार घाडगे
पंढरपूर : पंढरपूर शहरातील मालमत्ता धारकांकडे तब्बल १४ कोटी १८ लाख २४ हजार रुपयांची कर थकबाकी आहे. ही थकबाकी वसुली करण्यासाठी नगरपालिकेकडून पाच हजार थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, पालिका प्रशासन येत्या १ मार्चपासून विशेष वसुली मोहीम सुरू करणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली.