पंढरपूर भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांचे निधन 

Waikar
Waikar
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : भारतीय जनता पक्षाचे पंढरपूर शहराध्यक्ष संजय वाईकर (वय 53) यांचे मध्यरात्रीच्या सुमारास सोलापूर येथे निधन झाले. 

संजय वाईकर यांनी पत्रकार म्हणून अनेक वर्षे काम केले. शहरातील एका दैनिकाचे संपादक म्हणून ते काम करत होते. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देखील त्यांचे काम सुरू होते. तीन वर्षांपूर्वी त्यांची भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली होती. 

काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना सुरवातीस वाखरी येथील एमआयटीमधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना त्रास वाढल्यामुळे पंढरपुरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना सोलापूर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

mantralay
Punyashlok Ahilyadevi Holakar univercity, solapur
उजनी धरण
Input Tax Credit
Marathi News Esakal
www.esakal.com