पंढरपूर : पंढरपुरात बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडून भाविकांच्या भावनेशी (Pandharpur Holy Water Scam) खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क भाविकांकडून पैसे घेऊन चंद्रभागेचं (Chandrabhaga River) पाणी तीर्थ म्हणून विक्री केल्याचा त्यांचा हा गोरख धंदा उघड झाल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.