Pandharpur Couple Death : वटपौर्णिमेदिवशीच विजेचा धक्का लागून शेतकरी दांपत्याचा जागीच अंत; जन्म-जन्मांतराची सुटली सोबत, विहिरीवर मोटार सुरू करायला गेले अन्...

Couple Dies of Electrocution While Starting Farm Pump : पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथे विहिरीवरील शेतीपंप सुरू करताना पतीला विजेचा धक्का बसला. वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीलाही धक्का बसून दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Pandharpur farm pump electrocution accident

Pandharpur farm pump electrocution accident

esakal

Updated on

पंढरपूर : शेतीपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पंढरपूर तालुक्यातील आंबेगावात आज सकाळी घडली. वटपौर्णिमेच्या दिवशीच पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात (Husband wife electrocuted in agricultural field) आहे. लक्ष्मण बाबू नागणे व अलका लक्ष्मण नागणे या दाम्पत्याचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com