Sharad pawar and mla abhijit patil
sakal
पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. या मागणीसाठी फडवणीस सरकार विरोधात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी (ता. 26) महाविकास आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातून हजारो शेतकरी सहभागी होणार आहे,अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी आज येथे दिली.