
पंढरपूर - माघी यात्रेच्या सोहळ्याकरिता अडीच लाखाहून अधिक भाविकांचे पंढरीत आगमन झाले आहे. माघी दशमी दिवशी शुक्रवारी (ता. ७) पहाटेपासूनच चंद्रभागा नदीस्नानाची पर्वणी साधण्यासाठी नदीकिनारी लाखो भाविकांची गर्दी झाली होती. दरम्यान शुक्रवारी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग सात नंबरच्या पत्रा शेड पर्यंत गेली असून श्रींच्या दर्शना साठी १६ ते १८ तासांचा अवधी लागत आहे.