esakal | कोरोना इफेक्‍ट : पंढरपूर बाजार समिती प्रशासनाचा मोठा निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur market Committee decides to close till March 31

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनता कर्फ्युला साथ द्या 
कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी जनता कर्फ्युचे आवाहन केले आहे. रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत लोकांनी बाहेर न पडता. घरामध्ये बसून राहा, असे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला पंढरपूर शहर व तालुक्‍यातील लोकांनाही साथ देऊन रविवारी दिवसभर आपापाल्या घऱी बसून राहावे असे आवाहन पंढरपूर विभागाचे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. 

कोरोना इफेक्‍ट : पंढरपूर बाजार समिती प्रशासनाचा मोठा निर्णय 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून अनेक उपाय योजना सुरु आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले विठ्ठल रुक्‍मिणीचे मंदिर भाविकांसाठी बंद केल्या नंतर जिल्हा प्रशासनाने शहरातील मॉल, शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. आणखी खरबदारी म्हणून प्रशासनाने आज पासून शहरातील पान टपऱ्यांसह बिअर बार परमिट रुम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या आदेशानुसार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने बेदाणा, डाळिंब, केळी सैदे बाजार ही बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेतला आहे. जीवनावश्‍यक वस्तू वगळता बाजार समितीमधील सर्व सौदे 31 मार्चपर्यंत ठेवले जाणार असल्याची माहिती सभापती दिलीप घाडगे यांनी दिली आहे. 

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्यानंतर प्रशासनाने नागरिकांची आरोग्याची काळजी घेतली आहे. कोरोना व्हायरस विरोधी प्रतिबंधात्मक उपाय योजनांची प्रभावीपणे अंमल बजावणी सुरु केली आहे. येथील उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी जिल्ह्यात पहिल्यांदा पंढरपुरात मंगल कार्यलाये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्‍यातील सर्व मावा, गुटखा, पान विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आजपासून बिअर बार, परमिट रुम देखील बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. 

प्रशासनाला सहकार्य म्हणून येथील बाजार समितीने आजपासूनच समितीमध्ये होणारे शेतीमालाचे सर्व सौदे बंद ठेवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. येथील बाजारात डाळींब, बेदाणा, केळी आणि कांद्याची मोठी आवक होते. यातून दररोज कोटयावधी रुपयांची उलाढाल होते. तरीही नागरिकांच्या सुरक्षेसाठी बाजार समितीने पालेभाज्या वगळून इतर शेतीमाल खरेदी विक्री बंद केली आहे. यामुळे शेतकरी आणि बाजार समितीचे आर्थिक नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत शेती माल विक्रीसाठी पाठवू नये, असे आवाहन बाजार समितीचे मार्गदर्शक तथा आमदार प्रशांत परिचारक यांनी केले आहे.