Pandharpur Municipal Election
esakal
पंढरपूर : पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत (Pandharpur Municipal Election) भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी जातीचे राजकारण करण्यासाठी भाजपचे सहा ते सात उमेदवार पाडले, असा गंभीर आरोप भाजपच्या पराभूत उमेदवार अर्चना रानगट यांचे पती नवनाथ रानगट यांनी केला आहे. रानगट यांच्या या आरोपामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रानगट हे भाजप नेते प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आहेत.