

Pandharpur Namsankirtan hall construction delay
esakal
राजकुमार घाडगे
पंढरपूर: पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने येथील श्री संत तनपुरे महाराज मठा लगत उभारण्यात येत असलेल्या भव्य असे नामसंकीर्तन सभागृहाचे बांधकाम आठ वर्षा नंतरही अपूर्ण आहे. जून २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या नामसंकीर्तन सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून ऑडिटोरियम, मल्टिपर्पज हॉल, आर्ट गॅलरी, अंतर्गत सजावट, वातानुकूलन ही कामे पूर्ण झाली असून फर्निचर, लँड स्केपिंग, एरिया डेव्हलपमेंट आदी कामे अपूर्ण आहेत.