
-राजकुमार घाडगे
पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलीस ठाणे लगतच्या ब्रिटिशकालीन पोलीस वसाहतीच्या जागेवर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत इमारतीच्या गृह प्रकल्पास अखेर मुहूर्त मिळाला आहे. ३६१ सदनिकांपैकी १६८ सदनिकांच्या आणि सुमारे ५३ कोटी रुपये खर्चाच्या गृहप्रकल्पाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. या प्रकल्पामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा निवासाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.