New Zealand Horse Racing
esakal
पंढरपूर : कान्हापुरी (ता. पंढरपूर) येथील राहुल रघुनाथ भारती या तरुणाने न्युझीलंडमध्ये "हाॅर्स रेसिंग स्पर्धेत" तब्बल 25 लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले (New Zealand Horse Racing) आहे. ग्रामीण भागातील या तरुणाने सातासमुद्रापलीकडे जाऊन भारताचा डंका पेटला आहे. रेसिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती मिळताच येथील ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.