
पंढरपूर : पंढरपूर शहरात जीबीएसचे दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. पहिल्यांदाच शहरात जीबीएसचे रुग्ण सापडल्याने शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान या दोन्ही रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे.