पंढरपूर : यात्रेपूर्वी पंढरीत कोविड सेंटर सुरू करा

आपत्ती व्‍यवस्‍थापन केंद्र संचालकांच्‍या सूचना
आपत्ती व्‍यवस्‍थापन केंद्र संचालकांच्‍या सूचना
आपत्ती व्‍यवस्‍थापन केंद्र संचालकांच्‍या सूचनाsakal
Updated on

पंढरपूर : आषाढी यात्रेत विठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखोंच्‍या संख्येने भाविक येत असतात. सध्या काही जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबरोबरच कोरोना चाचणी केंद्राची स्थापना करावी तसेच संशयित रुग्णास तत्काळ उपचार मिळावेत यासाठी कोविड केअर सेंटरची निर्मिती करावी, असे आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचालक (यशदा) कर्नल विश्वास सुपनेकर यांनी सांगितले.

आषाढी यात्रा कालावधीत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कराव्या लागणाऱ्या कामांच्या पूर्व तयारीच्या प्रशिक्षणाबाबत येथील नवीन भक्त निवास मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.सुपनेकर बोलत होते.

बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाढ तसेच संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. सुपनेकर म्हणाले, वारी कालावधीत गर्दीच्या ठिकाणी तसेच ज्या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात थांबतात त्याठिकाणी भाविकांच्या सुविधेसाठी शिघ्र कृती दलाची नियुक्ती करावी. प्रदक्षिणा मार्ग, नदी पात्र,घाट, पत्राशेड, दर्शन रांग, मंदीर परिसर तसेच ६५ एकर या ठिकाणी वेगवेगळे संभावित धोके लक्षात घेता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच अग्नीशमन यंत्रणा सज्ज ठेवावी. यात्रा कालावधीत शहरातील सर्व स्तोत्रातील पाण्याच्या नमुन्याची दररोज तपासणी करावी.

महावितरण कंपनीने रोहित्रांची तसेच विद्युत वाहक तार तपासणी करावी तसेच देखभाल व दुरुस्तीसाठी पथक नेमावे. असेही यावेळी श्री. सुपनेकर यांनी सांगितले.

यावेळी प्रांताधिकारी श्री. गुरव यांनी प्रशासनाकडून तसेच मंदीर समितीकडून आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती दिली. तर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी गर्दीच्या ठिकाणी संभाव्य धोके लक्षात घेता आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून तयारी केल्याची माहिती दिली.

तत्पूर्वी श्री. सुपनेकर यांनी प्रदक्षिणा मार्ग, नदी पात्र, घाट, पत्राशेड, दर्शन रांग, मंदिर परिसर, तसेच ६५ एकर या ठिकाणी भेट देवून पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Data Center
पंढरपूर चंद्रभागा नदी
Massive Infrastructure Push: Gadkari to Launch Projects Worth ₹2784 Crore in Akkalkot
Crime News: एनएसयूआयच्या पुणे विद्यापीठ अध्याक्षाविरोधात गुन्हा; विद्यार्थिनीचा केला छळ
Marathi News Esakal
www.esakal.com