Young Man Death : जलतरण तलावात बुडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू: पंढरपूर शहरातील प्रकार; सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर
Solapur News : यशराज माने हा तरुण शनिवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
"Emergency response at the swimming pool in Pandharpur after a 21-year-old drowns, sparking safety concerns."Sakal
पंढरपूर : येथील नगरपालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यशराज विजय माने (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे.