
पंढरपूर (सोलापूर) : कोरोना संकटामुळे हातावर पोट असलेले कामगार, लहान व्यावसायिक यांच्यासह समाजातील सर्वच घटक आर्थिक अडचणीत आले आहेत. अशा सर्व लोकांना कर्जपुरवठा करून त्यांना तातडीने आर्थिक आधार देण्याचा निर्णय पंढरपूर अर्बन बॅंकेने घेतला आहे. सुमारे 200 कोटी रुपयांची तरतूद या कर्ज योजनांसाठी करण्यात आली असून गरज पडल्यास आणखी तरतूद करण्यात येईल, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष, आमदार प्रशांत परिचारक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार परिचारक म्हणाले, लॉकडाउननंतर जवळपास अडीच ते तीन महिन्यांनंतर व्यवसाय पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे लगेचच मोठ्या प्रमाणावर पैसा लोकांच्या हातात येणार नाही. हे लक्षात घेऊन कर्ज घेतल्यानंतर पहिले तीन महिने कर्जफेडीचे हप्ते भरून घेतले जाणार नाहीत. यानंतर कर्ज घेणाऱ्यांकडून रोजच्या रोज व्यवसायाच्या ठिकाणी अथवा घरातून बॅंक प्रतिनिधी पैसे घेऊन जातील. कर्जफेडीसाठी तीन ते पाच वर्षांची मुदत देण्यात आली आहे. छोटे व्यवसाय करणाऱ्यांकडून रोजच्या रोज कर्जाचे पैसे भरून घेतल्याने व्याज ही कमी प्रमाणात बसते. जनता आत्मसन्मान योजनेत सर्व घटकांसह घरेलू कामगारांचाही समावेश करण्यात आला आहे. रस्त्यावर बसून लहान मोठे व्यवसाय करणाऱ्यांपासून ते घरोघरी जाऊन काम करणाऱ्यांना हे कर्ज तातडीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. 50 हजार रुपये कर्ज घेतल्यास रोजचा हप्ता 50 रुपयांच्या आसपास राहिल.
सोलापुरातील बातम्या वाचण्यााठी येथे क्लिक करा
बॅंक हे पैसे गोळा करण्यासाठी तात्पुरत्या कालावधीसाठी वसुली प्रतिनिधी नेमणार असून कर्जाच्या व्याजातील तीन ते चार टक्के रक्कम त्यांना पगार म्हणून दिली जाणार आहे. प्रत्येक कर्जदाराचा विमा देखील काढला जाणार आहे. बॅंकेचे कार्यक्षेत्र राज्यभर असून सर्वच शाखांमध्ये ही योजना लागू असणार आहे. हे कर्ज तीन अथवा पाच जणांचा ग्रुप करून दिले जाईल. छोटे कर्जदार एकमेकांना तारण राहतील. कर्ज घेणाऱ्या व्यावसायिकांना बॅंकेने आकर्षक छत्र्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. जेथे ते व्यवसाय करतात तेथे त्यांचे ऊन, पाऊस यामुळे रक्षण होईल. लॉकडाउनच्या काळात बॅंकेने अत्यावश्यक सेवेअंतर्गत जी दुकाने उघडी होती त्यांच्या दुकानात सुरक्षिततेच्या कारणास्तव बॅंकेने कॅश गोळा करण्याचे काम केले. रोजच्या रोज बॅंकेची गाडी प्रत्येक ठिकाणी जाऊन पैसे घेऊन येत होती. या काळात बॅंकेने या व्यापाऱ्यांना आरटीजीएस तसेच एनइएफटी आदी बॅंकिंग सेवा मोफत पुरविली आहे. मोठ्या व्यावसायिकांसाठी देखील बॅंकेने योजना तयार केली असून पूर्वीचे कॅशक्रेडिट असणाऱ्या ग्राहकांनी मागणी केल्यास त्यांच्या पूर्वीच्या कर्ज रकमेच्या दहा टक्के अथवा 25 लाख पर्यंत कर्ज मर्यादा वाढवून दिली जात आहे. या वेळी बॅंकेचे उपाध्यक्ष दीपक शेटे, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, सरव्यवस्थापक भालचंद्र जोशी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.