
सोलापूर : पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक सुलभपणे दर्शन व्हावे यासाठी पंढरपुरातील पत्राशेडचा पुनर्विकास, दर्शन मंडप आणि स्काय वॉक बांधला जाणार आहे. या कामासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेतला आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १०२ कोटी ७३ लाख रुपयांची निविदा काढली आहे.