पंढरपूर : परिवहन विभागाने (Transport Department) बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी (ता. 13) परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील बेशिस्त रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारताच भाजप कार्यकर्त्यांची दबंगगिरी समोर आली आहे. कारवाई मागे घ्यावी, यासाठी काही भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर गोंधळ घालत राजकीय दबाव टाकल्याची चर्चा सुरू आहे.