पंढरपूर : रक्तातील पेशी कमी (Low Blood Cell Count) झाल्याच्या कारणामुळे उपरी (ता. पंढरपूर) येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. रोहित भारत मोहिते (वय २५) असे मयत तरुणाचे नाव आहे. मागील तीन ते चार दिवसांपूर्वी थोडासा त्रास जाणवू लागल्यानंतर रोहितने स्थानिक खासगी डॉक्टरकडे (Doctor) उपचार घेतले होते.