

Pandharpur
esakal
पंढरपूर: लाखो वारकरी आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे जतन व संवर्धन करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार हे काम करण्यात येणार असून, त्यासाठी २३ व २४ जून रोजी विठ्ठल मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.