

Pandharpur
esakal
भारत नागणे
पंढरपूर: विठ्ठल रुक्मिणी मुर्तीवर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार करण्यात येणार्या लेपन प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी याचिका येथील भीमाचार्य बाळाचार्य वरखेडकर यांनी येथील जिल्हा न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर दोन दिवसापूर्वी न्यायालयात सुनावणी होऊन भीमाचार्य वरखेडकर यांचा न्यायालयाने स्थगिती अर्ज फेटाळला आहे. दरम्यान मंदिर महासंघाचे गणेश लंके यांच्या अर्जावर उद्या (ता.22) न्यायालयात निर्णय होणार आहे,अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.