Pandharpur VIP Darshan : पहिल्याच दिवशी VIP दर्शन बंदीचा फज्जा! मुनगंटीवारांना ठेवलं वेटिंगवर, गुलाबराव पाटलांना दिलं तात्काळ दर्शन; महायुतीच्या नेत्यांमध्येच दुजाभाव?

Pandharpur VIP Darshan ban during Ashadhi Wari : आषाढी वारीदरम्यान पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शनबंदी लागू असतानाही मंत्री आणि समर्थकांच्या प्रवेशावरून गोंधळ उडाला.
Pandharpur VIP Darshan ban during Ashadhi Wari

Pandharpur VIP Darshan ban during Ashadhi Wari

esakal

Updated on

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केलेल्या व्हीआयपी दर्शनाचा बुधवारी (ता.15) पहिल्याच दिवशी पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दर्शनासाठी ताटकळत (Vitthal Temple VIP entry controversy) ठेवले. तर, दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अनेक समर्थकांनी धक्काबुक्की करत मंदिरात प्रवेश केल्याने गेटवर काही काळ गोंधळ उडाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com