

Devotees can take easy darshan of Vithuraaya till November 28
Sakal
पंढरपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि भक्तिमय बातमी समोर आली आहे. आगामी कार्तिकी एकादशी वारीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या विठुरायाचे दर्शन सुलभ आणि अखंड व्हावे, यासाठी १४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पंढरपूर मंदिरात २४ तास दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यंदा २१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून, देवाचा विश्रांतीचा चांदीचा पलंग विधिवत पूजा करून काढण्यात आला आहे.