Sant Savata Mali: पांडुरंग निघाले संत सावता माळी यांच्या भेटीला, मंगळवारी संजीवन समाधी सोहळा

Devotees Join the Traditional Palkhi Procession: तीन दिवसांच्या प्रवासानंतर विठुरायाचे अरण येथे आगमन होणार असून, ११ ऑगस्टला संत सावता माळी महाराजांचा ७३१ वा संजीवन समाधी सोहळा भक्तिभावाने साजरा होणार आहे.
Sant Savata Mali

Sant Savata Mali

esakal

Updated on

पंढरपूर: आपला लाडका भक्त संत सावता माळी महाराज यांच्या भेटीसाठी शनिवारी (ता. ८) पांडुरंगाच्या पालखीने श्रीक्षेत्र अरणकडे प्रस्थान ठेवले. मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने विविध फुलांनी सजावलेल्या रथामध्ये पांडुरंगाच्या पादुका ठेवून पालखी सोबतच्या वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत अरणची वाट धरली. दरम्यान विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने पांडुरंगाच्या पादुकाचे पूजन केले. त्यानंतर मंदिरातील विठ्ठल चरणाचे दर्शन घेऊन पालखी मार्गस्थ झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com