
Solapur: जेवणाला चमचमीत करण्यासाठी शाकाहारी खवय्यांचा आवडता मेन्यू म्हणजे पनीर. पनीर टिक्का, पनीर मसाला, पालक पनीर, पनीर मटर, पनीर पुलाव, पनीर भुर्जी यासह अनेक डिशेसमध्ये मिळणारे पनीर तुम्ही आवडीने खात असाल तर ‘चीज ॲनालॉग’ही तुम्हाला माहितीच असायला हवे. ग्राहकांना पनीर आणि चीज ॲनालॉग यातील फरक लक्षात येत नसल्याने पनीर म्हणून चीज ॲनालॉगची विक्री होऊ लागली आहे.