
पांगरी : येडशी अभयारण्यातून बाहेर पडलेला वाघ दिवसेंदिवस मानवी वस्तीजवळ येत असून पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास वाघाने अभयारण्यापासून सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावर कापून पांगरी-कारी रस्त्यालगत असलेल्या शेतकरी अशोक तुळशीराम गोडसे यांच्या वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली.