

Academic Reopening Logistics: Deploying Tier-1 Executives for Mohol School Welcome Ceremonies
Sakal
मोहोळ : प्रदीर्घ विश्रांतीनंतर मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची सोमवार ता 15 रोजी घंटा वाजणार असून, यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व अध्यक्षांनी शाळा खोल्या धुवून स्वच्छ केल्या आहेत.यात विद्यार्थीही सहभागी झाले होते. जुन्या व नवोदित विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील विविध विभागाचे अ वर्ग दर्जाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.