

सोलापूर : माढा तालुक्यातील अकरावीत शिकणाऱ्या मुलीचा तिच्या पालकांनी माळशिरसमधील नात्यातील मुलासोबत विवाह लावण्याचे नियोजन केले होते. पण, चाईल्ड लाईनवरून मिळालेल्या माहितीवरून जिल्हा बालकल्याण समितीने मुलीच्या घरी पथक पाठविले. त्यावेळी विवाहाची तयारी पाहून पथकाने पोलिसांच्या मदतीने मुलीला आज (सोमवारी) बालकल्याण समितीसमोर हजर केले. त्यावेळी ‘आम्ही विवाह करणार नव्हतो, फक्त साखरपुडा करून विवाह फिक्स करणार होतो’ अशी सारवासारव केली.