esakal | सोलापूर जिल्ह्यातील १९ ठोक मद्य विक्रेत्यांना परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Permission to 19 wholesale liquor dealers in Solapur district

महाराष्ट्रातील रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमधील मद्य विक्री सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मद्य विक्री बाबत निर्णय न झाल्याने तळीरामची काहीशी निराशा झाली होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील मद्यनिर्मिती व ठोकमध्ये विक्रीला ४ मेपासून परवानगी दिली आहे. किरकोळ विक्रीचा निर्णय अंतिम टप्प्यात असून हा निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील १९ ठोक मद्य विक्रेत्यांना परवानगी

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : महाराष्ट्रातील रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमधील मद्य विक्री सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मद्य विक्री बाबत निर्णय न झाल्याने तळीरामची काहीशी निराशा झाली होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील मद्यनिर्मिती व ठोकमध्ये विक्रीला ४ मेपासून परवानगी दिली आहे. किरकोळ विक्रीचा निर्णय अंतिम टप्प्यात असून हा निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्मिती करणारे दोन कारखाने असून एक कारखाना सोलापूर शहरात तर दुसरा कारखाना माळशिरस तालुक्यातील श्रीपुरमध्ये आहे. यापैकी ग्रामीण भागातला श्रीपूर येथील कारखाना सुरू झाला आहे. शहरातील कारखाना अद्यापही सुरू झालेला नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात विदेशी मद्याचे ८ ठोक विक्रेते आहेत. देशी मद्याचे 11 ठोक विक्रेते आहेत. या 19 विक्रेत्यांना मद्यविक्री करण्याची परवानगी मिळाली आहे. सोलापूर शेजारी असलेल्या लातूर, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये मध्ये विक्री सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 19 ठोक मद्य विक्रेते पुणे जिल्ह्यातील इंदापूर, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यातील दुकानांना मद्य पुरवठा करतात. या दुकानांना मद्य पुरवठा व्हावा, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ठोक मद्य विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी देत असताना 50 टक्के मनुष्यबळावर काम करून सोशल डिस्टन्सचे पालन करावे, सर्व नोकरांची व कामगारांची थर्मल स्कॅनिंग करावी. ज्या नोकरास सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे आहेत, त्यांना ठोक मद्य विक्रीच्या दुकानांमध्ये प्रवेश देऊ नये, अशा स्पष्ट सूचना ही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या आहेत. प्रतिबंधितक्षेत्र वगळून घाऊक मद्य  विक्रेत्यांचे व्यवहार सुरु करण्यास परवानगी देत असताना सायंकाळी पाच वाजल्यानंतर व्यवहार सुरू ठेवू नयेत, अशी सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे. 

किरकोळ दुकानाबाबत निर्णय नाही
सोलापूर जिल्ह्यातील किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या दुकानदारांना सोशल डिस्टन्स व इतर तयारी बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांच्याकडून निर्णय आल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. 
- रवींद्र आवळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर

loading image