esakal | सोशल मीडियावर "कोरोना'चा हा फोटो होतोय व्हायरल 
sakal

बोलून बातमी शोधा

This photo of Corona is going viral

सोलापूर : चेहऱ्याच्या सुंदरतेच भर पडणारा महत्त्वाचा घटक म्हणजे हेअरकट. शाळा सुरू असताना मुलावर केशरचनेचे बंधन येत असल्याने सुट्ट्यांच्या काळात पालक आपल्या मुलांना आकर्षक कोरूना हेअर कट करून देण्याकडे वळत आहेत.

सोशल मीडियावर "कोरोना'चा हा फोटो होतोय व्हायरल 

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

सोलापूर : चेहऱ्याच्या सुंदरतेच भर पडणारा महत्त्वाचा घटक म्हणजे हेअरकट. शाळा सुरू असताना मुलावर केशरचनेचे बंधन येत असल्याने सुट्ट्यांच्या काळात पालक आपल्या मुलांना आकर्षक कोरूना हेअर कट करून देण्याकडे वळत आहेत. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे नागरिक चिंताजनक झाले आहेत. सर्वत्र ज्येष्ठ मंडळी घाबरली आहेत. या भीतीमुळे सरकारने गणपती, दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या यानंतर यावर्षीच्या नवीन "कोरोना'च्या सुट्या दिल्या आहेत. 
त्यामुळे आपली मुले काही गांभीर्याने घ्यायला तयारच नाहीत, सुटी मिळाली तर सुरू झाली त्यांची शायनिंग. रोजच नव्याने नवनवीन फॅशन दाखल होतात. सुरवातीपासूनच सलूनमध्ये लहान मुलांची बॉय कट, प्रिन्स कट, हनीसिंग कट आणि आता कोरोना हेअर कटचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामध्येच आता चर्चेत असलेला कोरोना हा विषाणू आजार असूनही लहान मुलांना त्याचे काही गांभीर्यच राहिले नाही, म्हणून केसांची हेअर स्टाईल चित्ररूपाने करण्यासाठी सरसावले आहेत. 

loading image